वढू बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी पोपट पांडे तर व्हाईस चेअरमन पदी हिरामण तांबे यांची निवड

1138

 कोरेगाव भीमा : (प्रतिनिधी,सुनिल भंडारे) – वढू बुद्रुक ता शिरूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली.  बिन विरोध झालेल्या या निवडणुकीत चेअरमन पदी पोपट ज्ञानोबा पांडे तर व्हाईस चेअरमन पदी हिरामण सीताराम तांबे यांची निवड करण्यात आली. १५ संचालक असणाऱ्या या सोसायटी वर चालू पंचवार्षिक निवडणुकीत गावातील श्री उदोबा महाराज पॅनलचे बहुमताने वर्चस्व असून निवडी नंतर पांडे व तांबे यांनी सांगितले कि, या वर्षी सोसायटी ची कर्ज वसुली शंभर टक्के झालेली आहे. शिवाय शेतकऱ्यांना शेती कर्ज पुरवठा तसेच पीक कर्ज वाटप मोठया प्रमाणात करण्यात आला आहे. पुढील कालावधीत शेतकऱयांना संस्थेकडून योग्य ते सहकार्य नक्कीच राहील असे सांगितले.  या वेळी संस्थेचे सर्व संचालक, पॅनल प्रमुख व माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, सरपंच रेखाताई शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, अंकुश शिवले, जालिंदर अरगडे, लाला शेठ तांबे, शहाजी पांडे, माजी चेअरमन विश्वास शिवले, गणेश लांजेकर व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *