शिक्रापूर,पुणे : शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समिती व विविध महिला सामाजिक संघटनांच्या महिलांनी येथील शिव स्मारका जवळ शिवदिपोत्सव केला साजरा

773

      शिक्रापूर,पुणे : शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे तरुण तसेच विविध महिला सामाजिक संघटनांच्या महिलांनी येथील शिवस्मारकाजवळ शिवदिपोत्सव साजरा केला. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून सुंदररित्या रेखाटण्यात आलेली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती दिपोत्सवात उजळून गेली.

           दिपावली निमित्त तरूणांचे मन शिवरायांच्या विचारानेही उजळून निघावेत. या भावनेने उत्सव समितीने शिवस्मारकाजवळ दिपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदाचे सहावे वर्ष आहे. नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांच्या हस्ते दिपोत्सवाची सुरूवात करण्यात आली.  दिपोत्सवाच्या ठिकाणी सुवर्णा सोनवणे , सपना कर्नावट व ऐश्वर्या लंघे यांनी रांगोळीच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली. त्याभोवती दिप प्रज्वलित केल्याने प्रतिकृती उजळून निघाली. नगरसेविका रोहिणी बनकर , मनिषा कालेवार, नगरसेवक अभिजित पाचर्णे , विनोद भालेराव , दक्षता समिती अध्यक्षा शोभना पाचंगे, उपनिरीक्षक किरण घोंगडे , आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशीकला काळे . अध्यक्षा सुनंदा लंघे , अॅक्टीव्ह ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा ,वारसा जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्री थोरात, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा पल्लवी शहा , अॅड .सीमा काशीकर , रूपाली ढमढेरे , नंदा खैरे , जयश्री थेऊरकर, युवा स्पंदनच्या प्रियांका धोत्रे , आदिशक्तीच्या सचिव लता नाझिरकर, वारसा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शिल्पा बढे, वर्षा नारखडे , अलका ढाकणे , उपक्रमाचे आयोजक कुणाल काळे ,योगेश जामदार , सचिन जाधव, आलोक वारे ,योगेश फाळके, अक्षय ढमढेरे , प्रशांत टकले , अभिषेक शितोळे आदिसह मोठ्या संख्येने तरुण व महिला यावेळी उपस्थित होते.

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *