दूरदृष्टी, कार्यक्षमता,पारदर्शकता असणारे नेते ना.दिलीपराव वळसे पाटील होत – दीपक माधवराव रत्नपारखी

502

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – आंबेगाव – शिरूरच्या चौफेर प्रगतीची त्रिसूत्री सातत्यपूर्ण ठेवत दूरदृष्टी, कार्यक्षमता,पारदर्शकता राखत गेली ३५ वर्षे आपल्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाठी सतत प्रयत्नशील असणारे व सर्वसामान्यांच्या व्यथा,अडचणींना धावून जाणारे राज्याचे सहकार मंत्री या भागाचे लोकप्रिय नेते ना.दिलीपराव वळसे पाटील च असल्याचे प्रतिपादन कवठे येमाई चे माजी सरपंच तथा रा. कॉ. अजितदादा गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक माधवराव रत्नपारखी यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहे.
डिंभे धरणामुळे आंबेगाव ,शिरूर तालुक्यात निर्माण झालेली सिंचनक्षमता.कुकडी प्रकल्पातुन निर्माण झालेली सिंचनक्षमता,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निर्मिती,कारखान्यास मिळालेले तांत्रिक व आर्थिक उत्कृष्टतेचे देश व राज्य पातळीवर १९ पुरस्कार,शरद सहकारी बँकेच्या २७ शाखा व त्या माध्यमातून ७५० कोटींचे कर्जवाटप,२४ हजारांवर सभासद,मतदारसंघातील आजचे सुमारे २० लाख लिटर दूधसंकलन,३०० दूधसंकलन केंद्रे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेती बरोबरच दुधाच्या व्यवसायास चालना मिळाली व बहुसंख्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
ना.दिलीप वळसे पाटील यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीतून आंबेगावच्या आदिवासी भागांत आश्रमशाळा,वसतिगृहे उभारण्यात आल्याने एका प्रकारे त्या भागात शैक्षणिक प्रगतीची दिशा मिळाली. याच बरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळांचे,जाळे,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात शैक्षणिक संकुल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासीशाळा आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव आणि शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे ITI आरोग्य सेवा निर्मिती,मंचरच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर,ट्रॉमा केअर सेंटरसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात वळसे साहेबांचे मोठे योगदान आहे. उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल रुग्णालयाला पुरस्कार देखील प्राप्त झाला.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे मिनी मंत्रालयाच्या स्वरूपाची प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. तीर्थक्षेत्रांचा-पर्यटनाचा विकास करताना श्रीक्षेत्र भीमाशंकर,आणि श्री महागणपती रांजणगाव येथे प्रशस्त भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देत तीर्थक्षेत्रांचा-पर्यटनाचा विकास करण्यात आला. टाकळी हाजीतील जग प्रसिद्ध मळगंगाकुंड येथे बहुउद्देशीय सभागृह, पर्यटक भाविकांना जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठी कुकडी नदीवर झुलता पूल बांधण्यात आला.
महिला सक्षमीकरण उपक्रम राबवताना २००० महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. तर १००० महिला संगणक प्रशिक्षित झाल्या.अनुसूया नागरी सहकारी पतसंस्थाचे १,६५२ सभासद ५ कोटी ७९ लाखांच्या ठेवी असून ४ कोटी ७६ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहेत. संस्थेचे ७ कोटी १२ लाखांचे खेळते भांडवल आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण उपक्रम अंतर्गत अनुसया महिला उन्नती केंद्रातर्फे आरोग्य शिबिरे, बचत गटांसाठी मार्गदर्शक शिबिरे,युवतींसाठी करियर मार्गदर्शन मेळावे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत.
ग्रामीण भागांत तंत्रशिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून ना.वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अवसरी खुर्द येथे १७ एकरांच्या  विस्तीर्ण
परिसरात शासकीय तंत्रनिकेतन,यात ३ मजली मुख्य शैक्षणिक इमारत २ मजली सुसज्ज कार्यशाळा,१६८ संगणकांची प्रयोगशाळा उभारण्यात आली असून आत्तापर्यंत एकूण ४,८७८ विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झाली आहे.
महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी अस्मिता भवनाची उभारणी देखील करण्यात आली असून ग्रामीण भागांत तंत्रशिक्षणाची सुविधा,शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द सुमारे ५० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले आहे. येथून आत्तापर्यंत एकूण ४,१९८ विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले असून स्वयंचल व यंत्र अभियांत्रिकी शाखांचे NBA Accreditation सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ३ प्रयोगशाळांचे काम प्रगतीपथावर आहे. ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिरूर आंबेगावमध्ये भरपूर विकासकामे करण्यात आली असून आपला हा भाग अधिकाधिक सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे साहेबांचे सातत्याने लक्ष असते. त्यांच्या सारखा सर्वगुण संपन्न नेता या भागाला लाभणे हे भाग्यच समजतो.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds