पिंपरी बुद्रुक येथे ग्रामसभा शांततेत संपन्न 

683

 नीरा नरसिंगपूर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे आज गुरुवार दिनांक 26 12 2019 रोजी ग्रामसभेचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपरी बुद्रुक येथे करण्यात आले होते.  या ग्रामसभे निमित्त सरपंच आबासाहेब बोडके, उपसरपंच जाहीराबी शेख, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक संजय बोडके, मा.चेअरमन सुनील बोडके, समाधान बोडके, ग्रामसेवक बळीराम शिंदे, कृषी अधिकारी अंजली अडसूळ, पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सुमित्रा कोकाटे, कृषी पशु वर्धन डॉक्टर पांडुरंग लोखंडे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमचा गाव आमचा विकास या विषयावर व लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदानावर सविस्तर कामाची निवड करण्यात आली सदर या सभेचा अध्यक्ष म्हणून सरपंच आबासाहेब बोडके तर सचिव ग्रामसेवक बळीराम शिंदे यांनी सभेत सविस्तर प्रस्ताव व मार्गदर्शन केले. या नंतर अनेक विषयावर कृषी अधिकारी अंजली अडसूळ यांनी ग्रामसभे निमित्त आपले विचार मांडत मागेल त्याला शेततळे, ठिबक व कृषी यंत्र असे अनेक विषयावर त्यांनी माहिती सांगितली.
पिंपरी बुद्रुक मधील आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सुमित्रा कोकाटे आपले सभेत विचार मांडत असताना म्हणाल्या की, पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रांमध्ये औषधाचा तुटवडा असल्याने समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांमध्ये लागणारे औषध, गोळ्या आम्ही स्वतः आणत असल्याचे सांगितले तर व आरोग्य केंद्रासाठी ग्रामसभेमध्ये वॉल कंपाऊंडची मागणी त्यांनी केली.
ग्रामसभेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग लोखंडे यांनी स्वच्छतागृह बांधकाम, पाण्याची सुविधा, कंपाऊंड गेटची मागणी केली. तसेच नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी   ग्रामपंचायतीकडून 20 गुंठे जागा उपलब्ध करण्याची मागणी केली. गावाच्या  विकासात्मक दृष्टिकोणातून यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी विविध उपाय योजना सुचविल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *