चाळकवाडी (पिंपळवंडी) ता. जुन्नर : येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला

जुन्नरच्या चाळकवाडीत बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

850
          पिंपरी पेंढार,जुन्नर : (प्रतिनिधी,अधिक डेरे) – पिंपळवंडी ता. जुन्नर येथील चाळकवाडी शिवारात बिबट्याचा विहिरीत पडून म्रुत्यू झाला. सदर घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असण्याची शक्यता असल्याचे वनखात्याच्या अधिका-यांनी सांगितले.जुन्नर तालुका हा बिबट्याप्रणव क्षेत्र असलेला तालुका असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे प्रमाण असुन गेल्या काही दिवसांमध्ये बिबटे विहीरीत पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच घटना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे घडली आहे.  येथील शेतकरी महादेव बाळशीराम सोनवणे व भागाजी बाळशीराम सोनवणे यांच्या चाळकवाडी येथील सामाईक विहिरीत आज गुरुवार ( दि.२६) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरातील महिला अनिता संदिप सोनवणे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना या विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या पडला असल्याचे दिसून आले.  याबाबतची माहिती संदिप सोनवणे यांनी वनखात्याला कळविली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनखात्याचे अधिकारी व रेस्क्यू टीम दाखल झाली.  हा बिबट्या भक्षाच्या शोधात विहिरीला कठडे नसल्याने विहिरीत पडला असण्याची शक्यता असल्याचे वनखात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
        घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी एस के साळुंके, इ. पी. विभुते, बी. के. खर्गे, सुरेश गायकर, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पिंपळवंडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खिल्लारी यांनी पोस्टमार्टेम केले. त्यानंतर मृत बिबट्याचा अंत्यविधी त्याच ठिकाणी करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *