दशक्रिया विधीचा खर्च टाळुन गरीबांना मदत : काठापुर खुर्द येथील औटी कुंटुबाचा आदर्श उपक्रम

754

  काठापूर ता.शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक ) : शिरुर तालुक्यातील काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी यांचे चुलते शंकर सखाराम औटी ( वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अतिशय कष्ठामधुन त्यांनी प्रगतशिल शेती केली. सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळुन औटी कुटुबांने कोरोनाच्या संकटात अडचणीत आलेल्या गरीब कुंटुबाच्या मदतीसाठी २५ हजार रुपयाची मदत केली. ही धनादेश रुपी मदत शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,पत्रकार संजय बारहाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.  या वेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी (आण्णा) , आदर्श काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी, सरपंच बिपीन थिटे, बाबांचे चिरंजीव पोपट व आनंदा शंकर औटी, कांताराम दाते, पत्रकार सतिष भाकरे,गोरक्षनाथ ईरोळे उपस्थित होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी औटी कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन लग्न व इतर विधिसाठी होणारा खर्च टाळावा व कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब जनतेला मदत करावी असे आवाहन गावडे यांनी केले.  लॉकडाउनमुळे शिरुर तालुका तसेच निघोज परिसरात पत्रकार मित्रांनी संघटीतपणे गोरगरीब गरजू घटकांना किराणा किट तसेच जीवनावश्यक वस्तू देउन समाजउपयोगी काम सातत्याने करीत आहेत.मागील साठ दिवसात ही मदत शेकडो कुटुंबापर्यंत कशी जाईल यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले आहेत. शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी
प्रशासनातील सर्व विभागांचा समन्वय साधीत शिरुर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची सदैव काळजी घेण्याचे काम केले आहे. तहसीलदार या महिला असूनही एवढ्या कार्यक्षमतेने काम करतात याचा शिरुर तालुक्यातील जनतेला निच्छीतच अभिमान वाटावा अशी त्यांची कामगीरी आहे. आरोग्य विभाग महसूल विभाग पोलीस विभागाने जनतेला चांगले सहकार्य केले आहे. जनतेने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन माजी आमदार पोपटराव गावडे  यांनी केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *