राजगृहावरील हल्ल्यासह महाराष्ट्रात घडलेल्या जातियवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ दोंडाईचात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निषेध व निदर्शने

353
              दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी,समाधान ठाकरे) – राजगृहावरील हल्ल्यासह महाराष्ट्रात घडलेल्या जातियवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ दोंडाईचात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निषेध व निदर्शने करण्यात आली.
              हजारो वर्षे अन्याय, गुलामी सहन करत जगणाऱ्यांच्या गुलामीच्या बेड्या तोडून माणूस म्हणून जगण्याची उमीद उभी करणारे तमाम मानवजातीचे प्रेरणास्तोत्र विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर माथेफिरुनी अचानक हल्ला करून राजगृहाच्या दिशेने दगडफेक करून, परिसरात असलेल्या सामानाची तोडफोड केली गेली, सीसीटीव्ही कॅमेरे व तिथे असलेल्या झाडांच्या कुंड्या तोडण्यात आल्या. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
            राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील अनेक विदवान, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना मानणारा वर्ग या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी सतत येत असतो, विजयादशमी, जयंती, महापरिनिर्वाण दिनी तर लाखोंचा सागर जमा होतो. तमाम भारतीयांसाठी हे अतिशय महत्वाचे स्थान आहे.
              या ऐतिहासिक वास्तू वर दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या देशात कोरोना महामारीची साथ सुरू आहे. हे जाणीवपूर्वक घडवलेले षडयंत्र तर नाही ना ? अशी शंका ही उपस्थित केली जात आहे. या घटनेचा दोंडाईचा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून दोंडाईचा येथील प्रभारी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळा कडून दोंडाईचा येथील प्रभारी नायब तहसीलदार  अजय खैरनार यांना व दोंडाईचा पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांना निवेदन दिले गेले यावेळी मक्कन माणिक, फकिरा थोरात, भिमराव बागले, सनी बाबा जाधव, संजय बागले, भटू इंदवे, दिपक सोनवणे, बापू पिंपळे, संजय नगराळे, युवराज काळके, संतोष नगराळे ईश्वर आखाडे, शिवा नगराळे, दिलीप माणिक, कुणाल आखाडे, दिलीप शिरसाठ, आबासाहेब सैंदाणे, जिवन जवेरी, रविंद्र नगराळे, बापू रामोळे, सतीश ईशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
              आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कारवाई न झाल्यास पुन्हा संपूर्ण जिह्यात आणि महाराष्ट्रात संघटने कडून तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *