निमोणे गावात वाढदिवस साजरा करणाऱ्यावर गुन्हा दाखल : शिरूर पोलीस स्टेशनची कारवाई 

545

शिरूर,पुणे (समाजशील वृत्तसेवा) : सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून प्रशासन तसेच वैद्यकीय अधिकारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनसारखी महामारी पसरत असल्याने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना प्रशासनाकडुन वारंवार केल्या जात असताना शिरूर तालुक्यातील निमोणे येथील संकेत काळे याचा वाढदिवस त्याच्या ३०-४० मित्रांनी एकत्र येत सोशल डिस्टन्स न राखता वाढदिवस साजरा केला. जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून मास्क न लावता व  सोशल डिस्टन्स न राखता वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचे विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम २६९, १८८ याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक थेऊरकर करत आहेत. तरी अशा प्रकारे कोणी वाढदिवस साजरा करून  शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *