डिंग्रजवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी वैशाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड

389

कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, सुनील भंडारे) : शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडून नुकतीच झाली. सीमा भाऊसाहेब गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदावर वैशाली विकास गव्हाणे यांची बिनविरोध संधी देण्यात आली. सरपंच निवडणुकीच्या बैठकीच्या अध्यक्ष निवडणूक अधिकारी चंद्रशेखर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीचे कामकाज तलाठी अश्विनी कोकाटे यांनी पाहिले. यावेळी वैशाली विकास गव्हाणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. “निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावले पाहिजे या उद्देशाने कार्यक्रमाचे औचित्य साधत वृक्षारोपण हा सामाजिक उपक्रम राबवत सध्याच्या परिस्थितीला होत असणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आले. सर्वांनी या महामारी पासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सचं पालन करत आपण यावर मात करू शकतो .ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य ती ठोस भूमिका घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच वैशाली विकास गव्हाणे यांनी यावेळी प्रतिपादन केलं. तरुणांनी उद्योग व्यवसाय आणि शेती यासाठी आवश्यक असणारा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मावळत्या सरपंच सीमा गव्हाणे यांनी त्याचा सन्मान करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, दिलीप गव्हाणे, संदीप गव्हाणे, विजय गव्हाणे, मा.चेरअमन मधुकर गव्हाणे, माजी सरपंच सीमा गव्हाणे, विजया गव्हाणे, नमिता गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, शहाजी गव्हाणे, कानिफ गव्हाणे, रमेश गव्हाणे यांसह  ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *