मुरबाड शासकीय कोव्हीड सेंटरची हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याकडून पहाणी 

533

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरबाड शासकीय कोव्हीड सेंटरला आज हातमाग महामंडळ अध्यक्ष व ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील, ठाणे जिल्हापरिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हापरिषद उपाध्यक्ष  सुभाष पवार यांनी भेट देऊन सेंटरची पहाणी केली व कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाला किट व चवनप्राशचे वाटप करून त्यांना कोव्हीड योद्ध म्हणून सन्मानित केले. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 12 बधितांची ही त्यांनी विचारपूस केली. यावेळी मुरबाड येथील शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध आहे. मात्र तेथे तज्ञ डॉक्टर व्हेंटिलेटरची सुविधा देण्यासाठी नसल्याने  तेथे प्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना या परिस्थितीची कल्पना देणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिली. यावेळी ठाणे महिला शिवसेना जिल्हा प्रमुख आरती लाटे, मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख योगिता शिर्के, ठाणे जिल्हा परिषद सदस्या रेखा कंटे, संजय पवार, रामभाऊ दळवी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *