लुमसे यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

674
घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीसांना फोन करून मी मंत्रालयातमध्ये कक्ष अधिकारी या पदावर लोकसेवक आहे असे भासवून पोलीस व पोलीस अधिकारी यांना नाहक त्रास होईल या उद्देशाने संभाषण केल्याप्रकरणी मारूती लुमसे यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.
पोलीस फौजदार कोंडाजी रेंगडे यांनी याबाबतची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या तक्रारीनुसार घोडेगाव पोलीस ठाण्यात शासकीय टेलीफोन नंबरवर व प्रभारी अधिकारी यांचे मोबाईल फोनवर मारूती लुमसे रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि.सोलापूर या व्यक्तिने मी मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर लोकसेवक आहे असे भासवून मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक संदेशवाहन सामुग्रीचा वापर करून त्यावर दुस-या व्यक्तिस ऐकण्यास अथवा ग्रहण होईल असे संदेश वाहन वक्तव्य करून पोलीस कर्मचारी व प्रभारी अधिकारी यांना अरेरावीची भाषा वापरून शिविगाळ दमदाटी केल्या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *