रायगडामध्ये ठीक-ठिकाणी पुरसदृश्य परिस्थीती कायम ; वीज पुरवठा खंडित

419

 महाड, रोहा, माणगाव, उरण, पनवेल, खालापुर पाण्याखाली

  अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : रायगडात ३ जून रोजी निसर्गचक्री वादळाचा तडाखा बसला होता. त्या परिस्थिती मधून रायगड अजून सावरला नसताना पुन्हा बरोबर दोन महिन्याच्या कालावधीत पुन्हा रायगडाला वादळी पावसाने झोडपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस सतत मुसळधार वादळी पाऊसामुळे सावित्री, गाधांरी, आबां, काळ, कुडंलिका नद्यांची पातळी वाढली आहे. या नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नद्यांच्या काठावर वसलेल्या गाव, वस्त्यांना पुर सदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहेत. सतत पडत पावसामुळे असल्यामुळे महाड बाजारपेठे मध्ये दुस-या दिवशीही पाणी कायम आहे.
  •  महाड माणगाव परिसरात पावसाचा जोर जरी नसला तरीही पावसाची संततधार सुरुच आहे.महाड माणगाव मधील शहरी भाग अद्याप ही पाण्याखालीच आहे.
  •  कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहा शहरातील अष्टमी पुलावरुन पाणी गेले आणि रोहा शहराचा सपंर्क तुटला.
  •  रोहा, माणगाव, उरण, पनवेल, खालापुर परिसरात दुपार पासुन वादळी वा-यासह जोरदार पावसाची बँटीगं सुरूच राहिल्यामुळे रोहा शहरातील तसेच अष्टमी नाक्यावरील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
  • वादळी मुसळधार पावसाने ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब देखील पडले असल्यामुळे खालापूर, सुधागड अलिबाग पनवेल महाड माणगाव म्हसळा रोहा पेण या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *