कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाईत १४ दिवस बंद – प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांचा आदेश 

668
            शिरूर,पुणे :  (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) -शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून प्रशासन ही अलर्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून दि.५ पासून पुढील १४ दिवस कवठे येमाई गावठाण केंद्रस्थानी धरून ५ किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
                 कोरोना विषाणूचा प्रसार एका संक्रमित रुग्णाकडून अन्य इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होतो. सदर रुग्ण हा ११ जणांच्या नजीकच्या संपर्कात व १३ जणांच्या लोरीस्क संपर्कात आला असल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमणी यांनी दिली आहे.  तर प्रांताधिकारी यांच्या आदेशात म्हटल्यानुसार सदर रुग्नाच्या आईच्या दहाव्याच्या कार्यक्रमात त्या रुग्नाच्या, नजीकच्या संपर्कांतील व्यक्तींशी गावातील १०० पेक्षा जास्त लोकांचा संपर्क आल्याने अनेक जणांना बाधा होण्याची शक्यता आहे. कवठे येमाई, ता. शिरुर जि. पुणे येथे कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रंण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक झाले आहे.त्यामुळे प्रांताधिकारी  संतोषकुमार देशमुख यांनी अधिकारात मौजे कवठे येमाई, ता. शिरुर जि. पुणे हे  बफर क्षेत्र म्हणून दि. ०५/०८/२०२० पासून पुढील १४ दिवसांसाठी घोषित केले आहे. तसेच ७ दिवस गाव पूर्णतः करणेत येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. पुढील ७ दिवस फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.परंतु सदरच्या क्षेत्रामधील नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंधित क्षेत्रामधील दुचाकी व चारचाकी वाहनांची हालचाल रोखणे जरुरीचे असल्याने प्रतिबंधित  क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणा-या  वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांच्या वापरावर बंदी येत असल्याचे ही आदेशात म्हटले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *