आयसीएमआरने दिलेल्या “ट्रिटमेंट प्लान” नुसार उपचार व्हावेत  -मंत्री दिलीप वळसे पाटील 

374
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : कोरोना पॉझिटिव्हचे काही रुग्ण निगेटीव्ह झाल्यानंतर इतर त्रासांमुळे अत्यावस्थ होत आहेत. यामध्ये काहि रुग्ण दगावत देखिल आहेत. याचे कारण काहि इंजेक्शन व औषधांचा जादा ढोस दिल्यामुळे शरिरातील इतर अवयांवर परिणाम  झाला व त्यातून रुग्ण अत्यावस्थ होत आहेत. म्हणून आयसीएमआरने दिलेल्या ट्रिटमेंट  प्लान नुसार उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक सरकारी व खाजगी डॉक्टरांना हा ट्रिटमेंट प्लान दिला जावा, अशी सुचना  कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव  तालुक्यातील कोरोना परिास्थितीचा आढावा घेण्यासाठी वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र देशमुख, पोलिस अधिक्षक अभिनव  देशमुख,  शरद बँकेचे अध्यक्ष  देवेंद्र  शहा, भीमाशंकर  कारखान्याचे  चेअरमन बाळासाहेब  बेंडे, पंचायत  समिती सभापती संजय  गवारी,  उपसभापती संतोष भोर, सुभाष  मोरमारे, नंदकुमार  सोनावळे, जिल्हा आरोग्य  अधिकारी   डॉ.भगवान  पवार, उपविभागीय  अधिकारी  सारंग  कोडोलकर, कार्यकारी अभियंता  बी.एन.बहिर, तहसिलदार  रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलिस निरीक्षक क़ष्णदेव खराडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार,  तालुका आरोग्य  अधिकारी डॉ.सुरेश  ढेकळे, डॉ.नितीन  देवमाने, डॉ.प्रताप चिंचोलीकर इत्यादी उपस्थीत होते.
सध्या जरी रुग्ण संख्या कमी होताना दिसत असली तरी गाफील राहुन चालणार नाही, दिवाळी रुग्ण संख्या वाढू शकते यासाठी सर्व शासकिय  यंत्रणांनी कोव्हिडवर बारकाईने लक्ष ठेवा. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी  हगणदारी मुक्ती मध्ये जसे गुड मॉरनींग पथक तैनात करण्यातआले होते. त्या धर्तीवर एक पथक तैनात करण्यात येणार आहे, असे  जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.
माझे  कुटूंब माझी जबाबदारी मध्ये तालुक्यात ५२६४ रुग्णांची अँटीजन  तपासणी करण्यात आली. यापैकी ६७७  रुग्ण कोरोना बाधित आढळून  आले. आदिवासी भागात पुणे,  पिंपरीचिंचवड  परिसरातून सतत लोक येत असतात. त्यामुळे येथे ससंर्ग वाढू शकतो म्हणून पुढच्या आठवडयात  आदिवासी भागावर लक्ष केंद्रित करुन घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले  जाणार असल्याचे  प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी यावेळी सांगितले.
 आसाणे पायरडोह येथे झालेल्या पाझर तलावामध्ये   जमिन गेलेल्या शेतक-यांना भुसंपादनाची रक्कम मिळाली नव्हती. यासाठी  १ कोटी ७ लाख रुपये मंजुर झाले असून लवकरच हि रक्कम बाधितांना  दिली जाणार असल्याचे सांगितले.
– दिलीप वळसे पाटील, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *