शिरूरच्या थिटे डी.फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

502

    शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी 2020 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.  त्यात शिरूरच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी चा प्रथम वर्षाचा निकाल 96.77% व व्दितीय वर्षाचा निकाल 98.36% लागला असून महाविद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत प्रथम वर्षातील कु. शेख फिरोजा (92.27%), कु.मोकाते शिवानी व शेळके प्राजक्ता (91.18%), कु.लखन सलोनी(91.09%) व द्वितीय वर्षात कु. स्नेहल पवार(95.10%), कु. वाघमोडे प्रतीक्षा (94.80%), कु.रोहकले वृणाली (94.50%)  यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
कोरोना विषाणू संसर्गाचा काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नियमित ऑनलाईन मार्गदर्शन व मॉक टेस्ट द्वारे परीक्षेचा सराव करून घेण्यात आला. अशी माहिती परीक्षा विभाग प्रमुख सौ. मीनाक्षी झिंजुरके यांनी दिली.तसेच कॉलेजच्या वतीने मेडप्लस फार्मसी करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 26 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.
प्रथम वर्ष डी. फार्मसीची प्रवेश अर्ज  भरणेसाठी शासनाकडून  दि.11 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे ,सचिव धनंजयजी थिटे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. द्वारकदास बाहेती सर,डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *