कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विष्णू शंकरराव पवार सेवानिवृत्त  

475

   शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्याची  एकेकाळी पोलीस निरीक्षक पदाची यशस्वी धुरा सांभाळलेले एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विष्णू शंकरराव पवार पोलीस खात्यातील आपल्या ३० वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. नियमानुसार व  वयोमानानुसार त्यांचा पोलीस खात्यातील सेवा कार्यकाळ समाप्त झाल्याने ३० वर्षांच्या सेवेनंतर ते वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. एक शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष,समुजतदार अधिकारी म्हणून पोलीस दलात काम करताना त्यांची ख्याती होती. ३० वर्षांच्या या सेवाकाळात पोलीस खात्यातील कठीण,तणावपूर्ण व कसोटीचे नोकरी कर्तव्य पवार यांनी ऊत्तमरीतीने,पारदर्शीपणा ठेवत व गुणवत्तापूर्ण कार्य त्यांनी पार पाडले. पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असताना पवार यांनी केलेले कर्तव्यदक्ष कार्य व त्यांच्या सुस्वभावामुळे अनेकांशी त्यांचे चांगले स्नेह संबंध निर्माण झाले. पोलीस दलात कर्तव्याशी असताना अनेक जणांनी दिलेल्या सहकार्यांबद्दल सेवानिवृत्ती नंतर पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *