मुरबाड,ठाणे : मुरबाड शहापुर रस्त्यावरील बंद असलेल्या काळु नदीच्या पुलावरुन एसटी ची मीनी बस चालु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे खासदार कपिल पाटीलांचे आश्वासन

556
         मुरबाड,ठाणे : मुरबाड- शहापुर रस्त्यावरील काळुनदीवरील पुलावरुन गेल्या दोन वर्षी पासुन बंद असुन धोकादायक स्थितीत काही वाहने यावरुन जातात. वाहतूक बंदी असलेल्या काळू नदीच्या पुलावरून एसटीची मिनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार कपील पाटील यांनी दिले आहे.
         मुरबाड लेनाड मार्गे शहापूर या रस्त्यावरील काळू नदीवरील पूल धोकादायक असल्याने या रस्त्यावरील वाहतूक गेल्या दोन वर्षा पासून बंद आहे त्यामुळे लोकांना  28 किमि जाण्यासाठी  25 किलोमीटरचा फेरा मारून  53  किमीचा प्रवास करावा लागतो हि बा  मुरबाड येथे आलेल्या खासदार कपील पाटील यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणली. काळू नदीवरील पुलावरून वाहतूक बंद असल्याने या मार्गावरून जाणारी अवजड वाहने शहापूर, शेणवा, किन्हवली, सरळगाव, मुरबाड मार्गे जात आहेत.
       हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाला असल्याने मंडळाने या रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद केला आहे मात्र  वाहन चालकांनी हे मातीचे अडथळे दूर करून लहान वाहनांची  वाहतूक पुन्हा सुरु केली आहे.  या पुलावरील शहापूर बाजूकडील भाग धोकादायक आहे मात्र येथून लहान वाहने जाऊ शकतात.  ही बाब खासदारांना सांगितली असता त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना या पुलाची पुन्हा पाहणी करून एसटीची मिनी बस या मार्गावरून सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *