महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ई – मॅरेथॉनचे इंदापूर तालुक्यात आयोजन – निळकंठ मोहिते यांची माहिती – आरोग्यदायी,स्वच्छ आणि निरोगी वातावरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

428

 इंदापूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – इंदापूर तालुक्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सीवायडीए सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने,१९ नोव्हेंबर  “जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व मुख्य सचिव सागर शिंंदेे यांंनी दिली.

स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे हा उद्देश मॅरेथॉनचा आहे.ई- मॅरोथॉनमध्ये सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात, त्यात ४२ किमी फुल मॅरोथॉन आणि २१ किमी हाफ मॅरोथॉन चा समावेश आहे,हे ई- मॅरोथॉन  १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पूर्ण करू शकणार आहेत.

यात सहभागी होण्यासाठी विशिष्ठ स्थळाची  निवड करून सहभाग्यांनी एकत्र येण्याची किंवा गर्दीसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याची गरज नसणार आहे.तसेच सहभागींनी शासकीय नियम पाळून,या ई- मॅरोथॉनमध्ये सुरक्षित अशा स्थळांची आणि योग्य वाटेल त्या वेळेची निवड करून आपली धाव पूर्ण करू शकतो. १ लाखापेक्षा अधिक व्यक्ती देशाच्या वेगवेगळ्या भागातून ई- मॅरोथॉन सहभागी होतील. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील युवकांनी नागरिकांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन आरोग्यदायी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्मितीसाठी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

या ई- मॅरोथॉनमध्ये सहभागी सुरक्षित अशा स्थळांची म्हणजेच खुले मैदान,घराच्या आत, घराच्या छतावर, सोसायटीच्या आवारात इत्यादी स्थळांची निवड करू शकतो.आपण १००० पाउल म्हणजेच १ किमी.असे अंतर गृहीत धरणार आहोत.या धावेचे निरीक्षण अॅप च्या माध्यमातून केल्या जाणार आहे.जे व्यक्ती फुल आणि हाफ ई- मॅरोथॉन पूर्ण करतील त्यांना यशस्वी सहभागीतेचे ई- प्रमाणपत्र आयोजकांकडून देण्यात येईल. ई- मॅरोथॉन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले आहे,ज्यात, युनिसेफ, प्लॉन इंटरनॅशनल,एन.एस.सी.फाउन्डेशन,तेर्रे देस होम्स, सेव्ह द चिल्ड्रन, वॉटर एड,राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.वाय.डी.ए.आदी संस्थांचा समावेश आहे.यामुळेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त युवकांना नागरिकांना सहभागी करण्यासाठी उपक्रम आयोजित केलेला आहे.

कोविड- १९ सारख्या साथीच्या आजारामुळे लहान मुलांवर मोठा परिणाम झाला आहे.त्यामुळे प्रामुख्याने गरीब मुले शाळाबाह्य,असुरक्षित आणि निराशाजनक स्थितीत गेली.सर्वांसाठी चांगले जग निर्माण करण्यासाठी आपण कठोर प्रयत्न केले पाहिजे.ई- मॅरोथॉन च्या माध्येमातून मुलांसाठी योग्य असलेला आपला देश  तयार करण्यास मदत होईल,आपल्याला सहयोगाने जागतिक स्वच्छताविषयक संकटांचा सामना करता येईल.नोंदणी विनामूल्य आहे,नोंदणी करण्यासाठी या वेबसाईटचा वापर करावा www.cydaindia.org.असेही आवाहन पत्रकार संघाचे तालुुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांंनी केेेले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष संदिप सुतार,मुख्य सचिव सागर शिंदे,कार्याध्यक्ष जावेद मुलाणी, मार्गदर्शक मधुकर गलांडे,जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, तालुका संघटक उदयसिंह जाधव,भिमराव आरडे,रामदास पवार,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *