निराधार वृद्ध महिलेसह गरीबांना दिवाळीत मदतीचा हात – रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम 

503
            शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – गोरगरीब,महिला व सामाजिक उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या जुने शिरूर येथील संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गरजू व गरिबांना विविध साहित्य भेट देत त्यांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरातील अनेक गोरगरीबांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देत राणी कर्डिले यांनी त्यांना किराणा साहित्य,दिवाळी फराळ,साडी-चोळी व इतर साहित्याचे वाटप केले आहे.
              दिवाळी हा सण हा सर्वत्रच आनंदाने साजरा केला जातो.परंतु काही ठिकाणी पाहिले तर गरीबीमुळे व सहाराच नसल्याने अनेकांना खायला एकवेळचे ही अन्न नसते. अशा लोकांचा चेहऱ्यावर कोणताही आनंद पहायला मिळत नाही.कोरोनाच्या काळात तर यांच्या हाताला कोणतेही काम नसल्यामुळे अजूनच बिकट परिस्तिथी झाली.रामलिंग परिसरातील अशा अनेक गोरगरिबांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने त्यांची दिवाळी आनंदात होण्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासाठी हात संस्थेच्या वतीने देत असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.केलेल्या मदतीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद झालेला पाहावयास मिळाला.
परिसरातील एक वृद्ध व निराधार आजी जिला पायाने व्यवस्थित चालताही येत नाही त्या आजीला मागील ४  महिन्यापासून संस्थेच्या माध्यमातून किराणा साहित्य देण्यात येत आहे.संस्थेच्या अध्यक्ष राणी कर्डिले आज त्या आजीच्या भेटीस गेल्यानंतर आजींना मोठाच आनंद झाला. त्यांना पहाताच आजी म्हणाल्याकि, मी तुमचीच वाट पहात होते. तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच काहीतरी घेऊन येताल,असे आजी बोलल्यावर वाईट वाटले. यावेळी खुशालचंद बोरा,ज्योती गोसावी, सुनंदा घावटे, अनुजा घावटे यांनी ही खूपच सहकार्य केले.
           ” समाजात अशा कितीतरी व्यक्ती असतील कि ज्या व्यक्तींना खरच आधाराची गरज आहे अशा व्यक्तींना प्रत्येकाने शक्य ती मदत केली पाहिजे.त्यांच्या ही जीवनात आनंदाची एक ज्योत लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” 
– राणी कर्डिले,- अध्यक्षा, रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,शिरूर 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *