सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याजवळ अमली पदार्थ विक्री करणा-यास अटक –  गुन्हे शाखेची कारवाई  

461

    लोणी काळभोर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – पुणे – सोलापूर महामार्गानजीकच्या कदमवाक वस्ती हद्दीत कवडीपाट टोल नाका परिसरात आमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ६८५० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहे.या कारवाईनंतर लोणी काळभोर परिसरात ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरलेले असणार हे अधोरेखित झाले आहे. सध्या या ठिकाणी गांजाची व अवैध दारुची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून याचे जाळे पोलिस अधीक्षक उध्वस्त करणार का  ? हे पाहणे नागरिकांच्या दृष्टीने औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे सोलापूर महामार्गावर गस्तीवर असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मैफड्रोन( DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या टोल नाक्यावर सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले व त्याची अधीक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी (वय 47 वर्षे) सध्या रा गंगाधाम कासा, ग्रीन सोसायटी, ५ वा मजला फ्लॅट क्र 505, कात्रज, पुणे (मूळ रा. किट्टू पुजारी पंडित बिल्डिंग पहिला मजला फ्लॅट नं १३ राजरामोहन रॉय कामा बाग समोर गिरगाव मुंबई) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या उजव्या खिशात प्लास्टिकच्या पुडी मध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ सापडले.
सापडलेल्या मुद्देमालासह सादर इसमास पुढील तपास कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,पोलिस हवालदार राजेंद्र पुणेकर,विजय कांचन,धिरज जाधव,अक्षय नवले यांनी केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *