मुरबाड ट्राम केअर सेन्टर मधील कोव्हीड सेन्टर बंद करून त्यात कोव्हीड लसीकरण करणार -ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.वठारे

326
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात गेल्या तीन दिवसांत 9 कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आरोग्यविभागाच्या अहवालात जाहीर केले आहे. मात्र मुरबाड मधील खाजगी व सरकारी कोव्हीड रुग्णालय बंद केल्याने कोरोना बधितांना थेट ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून, मुरबाड ट्राम केअर सेन्टर मधील कोव्हीड सेन्टर बंद करून त्यात कोव्हीड लसीकरण करणार असल्याचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ वठारे यांनी सांगितले.  मुरबाड तालुक्यातील 59 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आता पुन्हा कोरोना बाधित अहवाल प्राप्त होताना दिसत असताना, कोरोना बधितांची उपचार यंत्रणा बंद पडल्याने प्रशासन ग्रामीण भागात याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. सर्व सुरळीत सुरू असताना नवे रुग्ण आढळून येणे हे धोकादायक असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *