सेवानिवृत्त सैनिकांचा केला गावकऱ्यांनी सन्मान ; मुरबाड तालुक्यातील धसई परिसरातील नागरीकांनी घेतली भेट

324

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : भारतीय सेनेतुन सेवानिवृत झालेले मेजर संतोष किसन म्हाङसे यांचा आपल्या मातृभुमीत सेवापुर्ती सोहळा मुरबाड तालुक्यातील धसई  परिसरातील किरपण पाडा येथे संपन्न झाला. सदर नागरी सत्कार कार्यक्रमासाठी धसई जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुभाष आप्पा घरत, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, मुरबाङ पंचायत समिती उपसभापती सिमाताई घरत,आण्णा घोलप, चेतनसिँह पवार व बोंद्रे सर उपस्थित होते. भारतीय लष्करी सेवेत सन २००५ साली रुजू झालेले मेजर संतोष किसन म्हाङसे जम्मू काश्मीर येथुन १६ वर्षे भारतीय लष्करी सेवा करुन निवृत्त झाले, असुन त्यांच्या स्वागतासाठी धसई व धसई परिसरातील नागरिक सामील झाले होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *