ग्रामपंचायत निवडणूक निकला नंतर दावेदारी साठी राजकीय पक्षांची रस्सीखेच

320
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायत पैकी 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. काल उर्वरित 39 ग्रामपंचायत मधील 160 उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीतून दिसून आले. 178 सदस्य या पूर्वीच बिनविरोध झाले असताना, आता 44 ग्रामपंचायतचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत कुठल्याही राजकिय पक्षाचे चिन्ह नसते. मात्र तरीही या निवडणूकीवर राजकिय दावे होताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या निकला नंतर राजकिय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे.
तालुक्यातील 44 ग्रामपंचायत पैकी 32 ग्रामपंचायत वर शिवसेना दावा करत आहे. तर 33 ग्रामपंचायत वर भाजप दावा असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी सांगितले.  तर मनसेला या निवडणुकीत पूर्ण अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ला थोड्या प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र तालुक्यातील 44 ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे सुभाष पावर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे त्याचप्रमाणे काँग्रेस ची धुरा स्वीकारलेले स्वगृही परतलेले भाजप माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. काँग्रेसच्या अस्थित्वाची तर भाजप आणि शिवसेनेच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत दिसत होती. तर मनसे ही नशीब अजमावले, पण हाती काहीच आलं नाही. मात्र शिवसेना व भाजप यांच्यातील राजकिय रस्सीखेच पहायला मिळाली. पण सरपंच पदाच्या आरक्षणानंतर राजकिय पक्षांनी केलेले दावे किती सत्य होतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र भाजपा 33 आणि शिवसेनेने 32 ग्रामपंचायत वर केलेले दावे पहाता उर्वरित ग्रामपंचायत वर कुणाचं वर्चस्व हे सरपंच आरक्षण व सरपंच पद जाहीर झाल्यावरच समोर येणार असल्याने, सरपंच आरक्षण पदाच्या प्रतीक्षेत राजकिय गणित अडकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *