चिखलगाव कापशी दरम्यान भीषण अपघात ; 3 ठार तर 5 जण गंभीर जखमी ; वाहनांचा चुराडा

542
 
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातुर महामार्गावरील चिखलगाव कापशी दरम्यान शनिवारी सकाळी 11 वाजता दोन वाहनांची भीषण टक्कर झाली. यामध्ये तीन ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना घडली. जखमींना अकोला येथे हे उपचारार्थ भरती करण्यात आले. दोन कुटुंब अकोला येथे उपचारासाठी सकाळी नऊ वाजता mh37v5381 महिंद्रा सुप्रो या प्रवासी वाहनाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावाजवळील कळंबेश्वर येथून निघाले होते. मात्र सकाळी 11 वाजता चिखलगाव कापसी दरम्यान अकोला कडून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 गाडी क्रमांक mh30L2996 ची प्रवासी वाहन महिंद्रा सुप्रो mh 37 v5381 समोरासमोर धडक झाली. यामध्ये प्रवासी वाहनाचा चालक संजय निवृत्ती राऊत वय 45 वर्ष राहणार मुंगळा, बाळू बळीराम कुरे वय 35 वर्ष राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम, लक्ष्मीबाई रामभाऊ वंजारे वय 55 वर्ष राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. याच प्रवासी वाहनातील ज्ञानेश्वर रामभाऊ वंजारे वय २७ वर्ष, रामभाऊ गोविंदा वंजारे वय 58 वर्ष ,दगडाबाई बळीराम कुर्हे वय 65 वर्ष ,गायत्री ज्ञानेश्वर वंजारे वय दोन वर्ष ,भागवत बळीराम कुर्हे वय 32 वर्ष सर्व राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे सर्व अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना अकोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. यातील काही जण अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
अपघाताचे वृत्त कळताच चिखलगाव येथील तपे हनुमान मंडळाचे युवक गोपाल काकड, अतुल सपकाळ, सागर चांदुरकर, महादेव कुवारे, विकी शेगोकार, अभिषेक ढगे, विकी तायडे, सुनील ढगे, मंगेश चांदुरकर, प्रतिक बळवंत, कार सुरेश ठाकरे, साबीर शेख, दुले खान, युसूफ खान यांनी अपघातातील जखमींना तातडीने दवाखान्यात पाठवले. त्यामुळे आठ पैकी पाच जणांचे प्राण वाचले त्यांच्यावर उपचार चालू आहेत. घटनेचे वृत्त कळताच पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी, मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे, पोलीस नाईक पंजाबराव चराटे, हेड कॉन्स्टेबल अर्जुन दुतोंडे, वाहन चालक जगदीश शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *