मिडगुलवाडीत ग्रामविकासलाच पुर्ण बहुमत

394
सणसवाडी, ता.शिरूर (-प्रतिनिधी, झानेश्वर मिडगुले) : शिरूर तालुक्यात आदर्श ग्रामसाठी प्रगतीपथावर असलेल्या मिडगुलवाडी ग्रामपंचायतीवर सर्वच जागांवर विजय मिळवून माजी आदर्श सरपंच सुनिलनाना मिडगुले यांनी निर्विवाद बहुमत मिळविले व विरोधकांचे सत्ता प्राप्तीचे प्रयत्न निष्फळ ठरविले. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या एका वार्डातील २ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या व उर्वरीत सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न विरोधकांचे अराजकारणी डावपेचांमुळे असफल झाल्याने ५ जागांवर निवडणुक लागली.
सुनिल मिडगुले यांनी केलेल्या पाठपुराव्याने फियाट कंपनीकडून दोन कोटींची कामे व जन्मभुमीसाठी ५२ लाखांचा निधी त्यांनी आ.महेशदादा लांडगे व नगरसेवक नितीन लांडगे यांचे फंडातून तर १५ लाखांवर सहाय्य भोसरीतील कंपन्याकडून वाडीसाठी आणले होते. रस्ते, पाणी, शाळा सुधार, नाला खोलीकरण, केटीवेअर, स्मशानभुमी,
वृक्षारोपण अशी बरीचशी कामे झाल्याने लोकांची त्यांना सहानुभुती होती. ७ पैकी ६ जागा मिळून सर्व निर्विवाद बहूमत दिल्याने मतदारांचे आभार नवनिर्वाचित सदस्य व माजी आदर्श सरपंच प्रभावती मिडगुले यांनी मानले व वाडीची उर्वरीत विकासकामे सहकाऱ्यांचे मदतीने करण्याचा मनोदय व्यक्त केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *