तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारे दोघे गजाआड – लोणी काळभोर पोलिसांची कारवाई 

382
          लोणी काळभोर,हवेली : (प्रतिनिधी,एम.डी.फलटणकर) :- कुंजीरवाडी येथे वाहन चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या  दोन युवकास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये व चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
           लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रशांत बाळासाहेब मोरे हे आपल्या मालकीच्या हायवा या वाहनातून मुरुम कुंजीरवाडी ते आळंदी म्हातोबा दरम्यान वाहतूक करत असताना अजय दिगंबर वाघमारे व महेश शिवाजी माने रा.पापडेवस्ती हडपसर यांनी मोटारसायकलवरुन येऊन हायवास आडवी लावून आम्हाला कट का मारला असे विचारुन तलवारीने हायवा गाडीच्या काचा फोडून मारहाण करत त्यांच्या कडील दहा हजार रुपये बळजबरीने काढुन घेऊन तिथून धूम ठोकत पळ काढला.  यावर मोरे यांनी तात्काळ  लोणी काळभोर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर, रंजन रणवरे,रुपेश भगत, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, मुकुंद रणमोडे, पोलिस नाईक लोकेश राऊत, शंकर साळुंखे, महेंद्र चांदणे, पोलिस शिपाई रोहिदास पारखे यांच्या पथकाने आळंदी म्हातोबा परिसरातील तरडे गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी दोन तरुण पैशाची वाटणी करताना आढळून आले.  त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा हजार रुपये व चार महागडे मोबाईल जप्त केले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *