शाळेची फी न भरल्याने 10 वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेचे फॉर्म भरण्यास मज्जाव – मुरबाडला आरपीआय सेक्युलरच्या आक्रमकतेपुढे व्यवस्थापण नमले 

358
मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरातील नामांकित दुय्यम शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना चक्क बोर्डाच्या परिक्षेसाठी मज्जाव करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती प्राप्त होताच रिपाई सेक्युलरच्या कार्यकर्त्यांनी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राकेश पाडवी यांच्या गाडीला घेराव घालून जाब विचारला असता धक्कादायक माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
   शहरातील दुय्यम शिक्षण संस्थेमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तालुक्यातील हजारो गोरगरीब, दलित, आदिवासी व अल्प संख्याक विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेने अचानक लादलेल्या या जुलमी फर्मानामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य क्षणार्धात अंधारात आले आहे. याबाबत रिपाई सेक्युलरच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता मागील वर्षाची शालेय शिकवणी व अन्य फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा चालू एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षा अर्ज न भरण्याचा तोंडी फतवा संस्थेचे अध्यक्ष व मुरबाड मतदार संघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले असल्याचे उत्तर मुख्याध्यापक राकेश पाडवी यांनी रिपाई कार्यकर्त्यांना दिले.
        यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, लक्ष्मण खोळंबे  किशोर गायकवाड  राजेश गायकवाड , रामचंद्र टंटोले शहर अध्यक्ष, ऍड. निखिल अहिरे विद्यार्थी संघटना प्रतिनिधी, रवींद्र गायकवाड यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित झाले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, पोलिस नाईक विनायक खेडकर यांनी धाव घेऊन मुख्याध्यापक राकेश पाडवी सह संस्थेचे पदाधिकारी चंद्रमोहन दुगाडे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन ही यावेळी त्यांनी दिले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *