मुरबाडचा आठवडे बाजार नव्या वर्षात पुन्हा सुरू – मुरबाडकरांना दिलासा 

405
              मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – कोव्हीड -19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता मुरबाड शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता मुरबाड नगरपंचायतचे मुख्यधिकारी परितोष कांकळ यांनी सरत्या वर्षी नियम व अटी च्या अधीन राहून मुरबाड आठवडे बाजार सुरू होत असल्याचे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केल्याने मुरबाडकरांना दिलासा मिळणार असून नागरपंचायतने नव्या वर्षाची भेट दिली आहे अशी प्रतिक्रिया हातावरचे पोट असणाऱ्या छोट्या,छोट्या व्यापारी वर्गातुन व्यक्त होत आहे.
             कोरोना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान,भाजीपाला, दूध ही दुकाने सुरु होती मात्र आठवडा बाजारावर अवलंबून व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला. मात्र मार्च महिन्यापासून बंद असलेला आठवडे बाजार आता नियम पाळून सुरू केल्याने व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. नगरसेवक व प्रशासन यांनी मुरबाड बाजारपेठ दर शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण आता बाजारपेठ व आठवडे बाजार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू होत असल्याने व्यापारी वर्गाने व नागरिकांनी काळजी घ्या असे आवाहन नगरपंचायत कडून करण्यात आले आहे.  नव्या वर्षाच्या स्वागता साठी मुरबाड शहरातील रस्ते धुऊन गटारी साफ करून सूंदर शहर स्वच्छ शहर हा उपक्रम राबवून नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी केली.  नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुरबाड आठवडे बाजार सुरू होणार असल्याने तालुक्यातील म्हसा , सरळगाव , धसई , टोकावडे या ही ठिकाणचे आठवडे बाजार सुरू होतील अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *