तांदळी,पुणे : दीपावली पाडव्यास ऐतिहासिक वारसा असलेल्या तांदळी तालुका शिरूर येथे विविध विकासकामांना सुरुवात, गावच्या वैभवात पडणार भर

811
            तांदळी,पुणे : नेताजी पालकरांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी येथे दीपावली निमित्ताने लोकसहभागातून विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली.
             शिरूर- श्रीगोंदा तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले हे छोटेसे पण टुमदार गाव. गावच्या कडेने जाणारी घोडनदी व भीमा नदीच्या पाण्याने १०० टक्के बागायती गाव म्हणून तांदळीची ओळख होते. गाव सधन झालेलं असल्याने व अनेक उच्च्शिक्षित गावात असल्याने गेल्या १०/१५ वर्षात तांदळी गावाने विकासाकडे वाटचाल केलेली पहावयास मिळते. गावात विविध पक्षांचे तालुका,जिल्हास्तरा वरील पदाधिकारी जरी असले तरी गावाच्या विकासात राजकारण ना आणता सर्वजण एकत्रित येत असल्याने गावचा चेहरामोहराच बदललेला पाहावयास मिळतो. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, प्राथमिक,माध्यमिक शाळा, ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी,दवाखाना, सुसज्ज ग्रामपंचायत,सोसायट्यांच्या इमारती व इतर अनेक काही गोष्टी तांदळी गावाच्या वैभवात भर घालत आहेत.
 दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गाळे व रोड नजीकच ग्रामपंच्यात कार्यालया समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामास बबन अण्णा गदादे व सुरेश पालकर यांच्या हस्ते प्रारंभ केला आहे. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा.सुभाष कळसकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे,सरपंच गोरख गदादे,उप सरपंच राजेंद्र कळसकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे संजय कळसकर,नामदेव खोरे,भुजंगराव कळसकर, गोरख खोरे, लक्ष्मण कळसकर, शामराव खोरे, दत्तात्रय नलगे, दत्तात्रय खोरे,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,विविध सोसायटयांचे चेअरमन संचालक व पदाधिकारी व अनेक मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या उपस्थित होते. ग्रामपंचायत गाळे व महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तांदळीच्या वैभवात आणखीन भर पडणार आहे. यावेळी ह.भ.प.स्वप्नील महाराज खोरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
– प्रतिनिधी,नागेश कुलकर्णी,(सा.समाजशील तांदळी)   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *