जनाबाई तापकीर यांचे वृद्धापकाळाने निधन 

546

    कोरेगाव भीमा,शिरूर  : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून अनेक वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेल्या व सेवानिवृत्तीनंतर कोरेगाव भीमा या आपल्या मूळगावी वास्तव्यास असलेल्या जनाबाई लक्ष्मण तापकीर यांचे आज रात्री साडे आठच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८५ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले विलास,(राम),दिलीप,सुरेंद्र,२ मुली कांता,लता,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल कवठे येमाई ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *