कवठे येमाई ग्रामपंचायतीसाठी ८५.७६ टक्के मतदान – आता प्रतीक्षा निकालाची 

717
         शिरूर,पुणे  : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावरील मोठे गाव व ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी आज मतदारांनी प्रचंड उत्साह दाखविला. एकूण ८५.७६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक केंद्र अधिकारी अशोक जाधव यांनी दिली.
           १७ ग्रामपंच्यात सदस्य असलेल्या कवठे येमाई ग्रामपंचायतीत ५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित १२ जागांसाठी आज मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने यावेळेस टक्केवारी चांगलीच वाढली आहे. कवठे येमाई वॉर्ड क्रमांक १ मध्ये ८५ टक्के, वॉर्ड क्रमांक २ बिनविरोध, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ९० टक्के,वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ८० टक्के, तर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ८५ टक्के तर वॉर्ड क्रमांक ६ साठी ९२ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. कवठे गावठाण,मुंजाळवाडी, गणेशनगर अशा ३ ठिकाणी मतदान व्यवस्था करण्यात आली होती.
            कवठे येमाईत १२ जागांसाठी आज झालेली मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात कुठलाही वादविवाद न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतमोजणीत कल कोणाला मिळेल याची धाकधूक आता सर्वच उमेदवारांना लागली असून दि. १८ होणाऱ्या मत मोजणी नंतरच सर्व निकाल स्पष्ट होणार असल्याने त्यासाठी सर्वांनाच दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *