शेती व्यवस्थापनातील विनोद इंगोले यांची त्रिसूत्री अनुकरणीय

411
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : जागतीक आणि स्थानिक स्तरावर शेतमालाला असलेली मागणी त्याआधारे तंत्रशुध्दपणे संबंधित पिकाचे व्यवस्थापन, उत्पादन आणि काढणी अशा सर्वच टप्प्यावर शेतकऱ्यांनी आज जागरुक राहण्याची गरज आहे. तूर, सोयाबीन या पारंपारीक पीकाच्या बाबतीत अशाप्रकारची जागरुकता धाकली (ता. बार्शीटाकळी जिल्हाअकोला) येथील शेतकरी विनोद ज्ञानदेव इंगोले यांनी जपली आहे. सेंद्रीय आणि रासायनीक शेतीपध्दतीचा सुवर्णमध्य ते साधतात याबाबतीतला त्यांचा आदर्श अनुकरणीय असल्याचे मत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्‍ता तसेच शेतकरी आंदोलनाचे समन्वयक चौधरी राकेश टिकैत यांनी व्यक्‍त केले.
शेती व्यवस्थापनपध्दतीची माहिती असणारी पुस्तीका प्रयोगशील शेतकरी विनोद इंगोले यांनी राकेश टिकैत यांना भेट दिली. त्यासोबतच शेती व्यवस्थापनासंदर्भातील अनुभवही मांडले. त्याआधारे राकेश टिकैत यांनी विनोद इंगोले यांच्या शेती व्यवस्थापन पध्दतीचे कौतुक केले. अकोला शहरापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर वाशीम जिल्हयाच्या सीमेवर धाकली हे गाव आहे. या भागातील बहूतांश शेती कोरडवाहू आहे. व्यवसायीक पीकपध्दतीत हा अडसर ठरत असल्याने पहिल्या टप्प्यात शेतीला सिंचनाची सोय करण्यावर विनोद इंगोले यांनी भर दिला. त्याकरीता तीन किलोमीटर अंतरावरील किनखेड लघु प्रकल्पापर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. यापुढील काळात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात या शिवारात विविध पीक प्रात्याक्षीक घेण्याचा त्यांचा मानस आहे. कांदा बिजोत्पादन तसेच मसाला पीकाची लागवडही ते करणार आहेत. त्या माध्यमातून या दुर्गम भागात प्रयोगशीलतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारची प्रयोगशीलता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अंगी रुजवावी तसेच शेतीला पूरक संसाधनाच्या उपलब्धतेसाठी टप्याटप्याने प्रयत्न करावे, असा सल्ला देखील  टिकैत यांनी दिला.
पाणी हाच शेतीचा आत्मा 
पुस्तिकेचे अवलोकनाअंती विनोद इंगोले यांच्या प्रयोगशीलतेची कल्पना राकेश टिकैत यांना आली. पारंपारीक पिकांना पर्याय शोधण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. परंतू त्याकरीता पाण्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले. पंजाब, हरियाणा व देशाच्या शेतीसंपन्न राज्यांमध्ये सिंचनाचे स्त्रोत बळकट आहेत. त्यामुळेच त्या भागात शेती बळकट असल्याने शेतकऱ्यांनी आपल्यास्तरावर संरक्षीत सिंचनाच्या सोयी निर्माण कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विनोद इंगोले यांनी पाण्याचे महत्व जाणत पहिल्याच टप्प्यात आपल्या शिवारापर्यंत पाणी आणले. अशाप्रकारे संशाधनाच्या निर्माणावर शेतकऱ्यांनी लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे, असेही श्री. टिकैत म्हणाले. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *