भारताचा दुसऱ्या क्रिकेट कसोटीत दणदणीत विजय – आर अश्विनची अष्टपैलू कामगिरी 

323

          शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढत भारतीय क्रिकेट संघाने चेन्नई तील दुसऱ्या क्रिकेट कसोटीत दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्माने केलेली दमदार शतकी खेळी व फिरकीपटू आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

  चेन्नईच्या याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत २२७ धावांनी भारतावर विजय मिळवला होता.तर आता त्याच मैदानावर भारताने मोठा विजय मिळवून मालिकेत  १-१अशी  बरोबरी केली आहे.विजयासाठी भारताने इंग्लंडसमोर ४२९ धावांचे लक्ष ठेवले होते. आज भारताला विजयासाठी ७ विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर गुंडाळला गेला.भारतीय संघाच्या  विजयाचा हिरो अष्टपैलू खेळी केलेला रविचंद्रन अश्विन ठरला. त्याने पहिल्या डावात ५, दुसऱ्या डावात ३ बळी घेत शतकासह त्याने विजयात उल्लेखनीय कामगिरी केली. तर भारताच्या अक्षर पटेलने पदार्पणातच ५ बळी घेतल्याने तो पदार्पणात ५ बळी घेणारा ९ वा भारतीय गोलंदाज ठरला.

भारत पहिला डाव – सर्वबाद 329  – रोहित शर्मा 161, मोईन अली 128/4

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 134  – बेन फोक्स 42; अश्विन 43/5

भारत दुसरा डाव – सर्वबाद 286 – अश्विन 106; मोईन अली 98/4

इंग्लंड दुसरा डाव –  सर्वबाद 164  – मोईन अली 43; अक्षर पटेल 60/5




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *