धानिवली टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया कंपनी मालकाचा कामगारांना कामावर घेण्यास हिरवा कंदील ;अंतिम निर्णय 18 तारखेला

416
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड जवळील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमी. या कंपनीला कामगार व धानिवली ग्रामस्थांनी शुक्रवारी घेराव घालून कंपनीत कामाला गेलेल्या कामगारांना बाहेर पडण्यास व दुपारी तीन वाजता कामावर जाणाऱ्या कामगारांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे  कंपनी परिसरात दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कंपनीचे मालक( व्यवस्थापण) व शासकीय  प्रशासन, कामगार, राजकीय पदाधिकारी, युनियन चे पदाधिकारी यांच्यात चर्चा होऊन लेखी आश्वासनानंतर घेराव आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले आहे.
टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमी. धानिवली मुरबाड या कंपनीचा पाॅवर प्लॅन्ट अचानक बंद केल्याने  54 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड पडली होती. त्यामुळे गेले 50 दिवस संघर्ष सुरू होता. खासदार कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक व  ग्रामस्थांनी सुद्धा आंदोलनास पाठिंबा दिला होता. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या कामगारांना न्याय मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र या कामगारांना कंपनीत अन्य ठिकाणी पुन्हा कामावर घेण्यास कंपनी तयार नसल्याने घेराव आंदोलन सुरू झाले होते. मात्र कामगारांची आक्रमकता, पहाता कंपनी प्रशासनाने नमती घेत कामगारांना कामात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्याने, 50 दिवसाच्या कामगारांच्या संघर्षाचा विजय झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *