मुरबाड नगरपंचायत निवडणूकीची प्रतीक्षा कायम

343
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायत निवडणूक लांबणीवर जाणार अशी चिन्ह दिसत असून, प्रभाग रचना, आरक्षण व अनधिकृत बांधकामे यामूळे नागरसेवनकांवर होणाऱ्या कारवाई यावर होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी मुरबाड नगरपंचायत ची मुदत संपली, मात्र निवडणूक लगेच लागेल अशी आशा असल्याने सर्वच राजकिय पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाली होती. तर काहींनी आपली उमेदवारी सुद्धा जाहीर केले होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार झालेली प्रभाग रचना व आरक्षण याला राष्ट्रवादी काँग्रेसचे हरेश पुरोहित यांनी हरकत घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे हरकती चे पत्र दिले. पण ही हरकत फेटाळून आरक्षण व प्रभाग रचना जैसे थे! असा निर्णय दिला. या निर्णयाला हरेश पुरोहित यांनी मुबंई उच्च न्यायालयात दाद मागितली असता 11, 18, 19 जानेवारी तसेच 3 व 9 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र 22 तारखेला पुन्हा सुनावणी असल्याची माहिती पुरोहित यांनी दिली. या निर्णय प्रक्रियेमुळे मुरबाड नगरपंचायत चे निवडणूक वारे थंडावले आहे.
तर शिवसेना शहर प्रमुख राम दुधाळे यांनी माजी नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांच्यावर शाळेचे अनधिकृत बांधकाम व मुरबाड शहरातील अनधिकृत गाळे बांधकाम प्रकरणी विद्यमान नगरसेवक यांच्यावर सहा वर्षे निलंबन कारवाई यासाठी तक्रारी अर्ज दाखल करून राजकीय संघर्ष पेटवला होता. या तक्रारीची दखल घेत मुरबाड नगरपंचायतकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल ही मागवण्यात आला होता. मात्र हा निर्णय देखील प्रलंबित आहे. तसेच मुरबाड नगरपंचायत निवडणूक हि लांबणीवर असल्याने नगरपंचायतमध्ये सध्या प्रशासकीय यंत्रणा कारभार पहात असल्याने, निवडणूक चे वेध लागलेले राजकीय पक्ष, आरक्षण, प्रभाग रचना व अनधिकृत बांधकाम प्रकरणात काय निर्णय लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *