गणस्तरिय प्रशिक्षण झालेच नसल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर

318
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव ग्रा पं प्रशासनाने आमचं गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत सन २०२१ -२२ ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यक्रमामध्ये ग्रा पं नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेतला त्यात बराच वेळ निघून गेल्याने विकास आराखडा व गणस्तरिय प्रशिक्षण झालेच नसल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा.पं. म्हणून आलेगावला ओळख आहे. येथील ग्रा.पं. सदस्य संख्या १७ असून उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडून उपसरपंच पदी मो रियासत बी जलालोद्दीन यांची निवड झाली आहे. दरम्यान ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत सन २०२१-२०२२ या कालावधीचा एक वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व गणस्तरिय कार्यशाळेचे आयोजन ग्रा.पं.प्रशासनातर्फे दि. १२ रोजी करण्यात आले होते. आमचं गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत एक वर्षाचा विकास आराखडा तयार करणे तसेच उपक्रम क्र ६.२ व ६.३ नुसार गणस्तरिय कार्यशाळेचे आयोजन दि १२ रोजी सकाळी ९-४५ वाजता पासून सायंकाळी ५-४५ वाजेपर्यंत ग्रा.पं. स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या वेळेत एकुन चार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वरीष्ठ कार्यालयाकडून प्रवीण प्रशिक्षक नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जयंत सोनोने उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळा कार्यक्रम दुपार २ वाजे पर्यन्त लांबत गेल्याने, सदर कार्यक्रमामधून अनेकांनी काढता पाय घेतल्याने सदर कार्यक्रम २:३० वाजताच संपविण्यात आला व वार्षिक विकास आराखडा ग्रामस्थांसमक्ष तयारच न झाल्यामुळे, सदर आराखडा गोपनीय अवस्थेत तयार करणार का? असा प्रश्न ग्रामस्थामध्ये चर्चेचा विषय बनला होता. वार्षिक विकास आराखडा बाबत विचारणा केली असता, ग्रा.पं. मासिक सभेत तयार करू असे ग्रामसेवक नंदकिशोर साळुंखे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *