रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा 

952
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा  करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले, जिजामाता यांच्या प्रतिमेचे पुजन करून, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर महिलांनी मनोगते व्यक्त केली. महिला सबलीकरण, सक्षमीकरण यावर मान्यवर बोलले. यावेळी धुणी-भांडी करणाऱ्या तसेच साफ- सफाई करून घर चालवणाऱ्या महिलेंचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले बोलताना म्हणाले, “या महिलांना समाजात मानाचे स्थान द्यावे, त्यांना कोणी कमी लेखू नये, कोणतेही काम असो ते प्रमाणिक करायचे, यात लाज बाळगु नये. महिलांनी संघटित होऊन,कामे केली तर त्या लवकर सक्षम होतील, एकी मध्ये खूप बळ आहे. महिलांनी एकमेकींना आदर दिला पाहिजे. स्वतः चा पायावर उभे राहिले पाहिजे. कुठेही महिलांना अडचण आली तर मी त्यांचा सोबत भक्कम उभे राहिल.”
यावेळी शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत यांच्या 14व्या वित्त आयोग निधीतुन महिलांसाठी मोफत फॅशन डिझाइनर, केक प्रशिक्षण -रामलिंग महिला उन्नती संस्थेमार्फत राबविण्यात आले होते. आज 50 महिलांना फॅशन डिझायनर प्रमाणपत्र, 30 महिलांना केक चे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य-तुषार दसगुडे, यशवंतराव कर्डिले, अभिलाष घावटे, हिरामण जाधव, शिक्षक-अर्जुन नीचीत, महिला सदस्या-संगीता दसगुडे ताई, उज्वला नेटके तसेच स्वाती थोरात, राणी चोरे, प्रिया बिरासदार, शर्मिला नीचीत, राणी शिंदे, गौरी पवार, सुनंदा घावटे, छाया जगदाळे, सारिका नेटके, शोभा परदेशी, गायत्री डिंगरे आदी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *