मुरबाड,ठाणे : मुरबाड च्या प्रवेशद्वारा वरिल घाणीचे साम्राज्य झाले दुर, सा.समाजशीलच्या बातमीचा परिणाम,नागरिकांकडून अभिनंदन

457
              मुरबाड,ठाणे : मुरबाड च्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य या मथळ्या खाली सा. समाजशिल मध्ये बातमी छापुन आल्यावर स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या मुरबाड नगरपंतायतीला जाग आली . व सा. समाजशीलच्या बातमीचा ईम्पँक्ट दिसुन आला व मुरबाड चे प्रवेशद्वार स्वच्छ झाले.
              मुरबाड च्या प्रवेशद्वावरच  घाणीच्या साम्राज्यातच मासळी व भाजीपाल्याची विक्री असताना याचा  परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करणारी मुरबाड नगरपंचायत या कडे कानाडोळा करताना दिसत होती. मात्र सा.समाजशिल मध्ये बातमी प्रसिद्ध होताच जाग्या झालेल्या नगरपंतायतीने स्वच्छता मोहीम राबविली. मात्र हा खर्च या ठिकाणी व्यवसाय करणार्यांनीच केल्याचे येथिल व्यापारी वर्गातुन समोर आली आहे.  तर घाणीच्या साम्राज्यात मासळी व भाजीपाला विक्री करत असताना खरेदीदार राष्ट्रीय महामार्ग 61 वरच वाहने उभी करत असल्याने आपघाताची शक्यता वाढली.  मात्र घाणीचे साम्राज्य दुर झाल्याने मुरबाडकरांमधून समाधान जरी व्यक्त होत असले तरी  वाहन कोंडी व शहरातील फुटपाथ मोकळे व धोकादायक पोल कधी हटवितात या कडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *