नीरा नरसिंहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभावाचे प्रतिक गाजी – ए – मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. ) तिर्थक्षेत्र लुमेवाडी ( ता. इंदापूर ) यांचा २५ वा उर्स शरीफ गुरूवार २९ नोव्हेंबर ते शनिवार १ डिसेंबर २०१८ दरम्यान होणार

968
  लुमेवाडी ता. इंदापूर येथील सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. )           
नीरा नरसिंहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभावाचे प्रतिक गाजी – ए – मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. ) तिर्थक्षेत्र लुमेवाडी ( ता. इंदापूर ) यांचा २५ वा उर्स शरीफ गुरूवार २९ नोव्हेंबर ते शनिवार १ डिसेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. या निमीत्त राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना जियारतला गोड जर्दा व दाळभाताच्या  महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यानिमीत्त दर्गाहवरती सुंदर, मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचे दर्गाह व ऊरुस कमिटी च्यावतीने सांगण्यात आले आहे.
               गाजी – ए – मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. ) यांच्या ऊरुसास हजरत सुफी वली चॉंद पाशा ( आवाटी ), हजरत सुफी अरीफबाबा ( मोमिनाबाद ), हजरत यादअली साहब ( छोटे बाबजी राजस्थान ) यांच्या जेरे – ए – निगरानी ( मार्गदर्शनाखाली ) संपन्न होणार आहे. गुरूवार २९ नोव्हेंबरला सांगली व सोलापूर जिल्ह्यासह काझीगल्ली ( अकलूज ) येथून चार वाजता संदल मिरवणूकीने बाबांच्या मजार शरीफवर चढवून प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवार ३० रोजी मुख्य ऊरुसा दिवशी संध्याकाळी ७ वाजता प्रसिध्द कव्वाल टिव्ही सुपरस्टार सर्फराज चिश्ती ( युपी ) व दरबारी कव्वाल  ( लुमेवाडी ) यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे. तसेच शनिवार सकाळी ८ वाजता जियारतला गोड जर्दाचे वाटप करुन ऊरुस संपन्न होणार आहे. ऊरुस निमीत्त आलेल्या लाखो भाविकांना दाळभाताचे लंगरखाना ( महाप्रसाद ) वाटप दुपारी ४ वाजलेपासून हजरत फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीच्यावतीने देण्यात येणार आहे.
 उरूसनिमीत्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खाजगी वाहनांचे मोठे नुकसान होते. तर उरूसनिमीत्त  भाविकांसाठी इंदापूर व अकलूज आगा राने एस.टी.बसची सोय करण्याची मागणी नागरिकांनी व भाविकांनी केली आहे. 
  – प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,निरा नरसिंहपूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *