समाजशील न्यूज नेटवर्क : शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सध्या दीपावली पर्व देशात,राज्यात व आपल्या शिरूर तालुक्यात ही हर्षोल्हासात सुरु आहे. शिरूर शहरा सहा तालुक्यातील विविध गावात वास्तव्यास असणारे नागरिक दीपावली सणाच्या निमित्ताने आपापल्या गावी जातात.त्यामुळे काही दिवस आपण वास्तव्यास असणारे घरे बंद असतात. त्याकरिता दिवाळीत बाहेरगावी जाताना आपल्या घराची सर्वोतोपरी सावधानता,दक्षता घ्या असे आवाहन शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे नागरिकांना केले आहे. याच बरोबर शिरूर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.
शिरूर पोलिसांच्या वतीने नागरीकांसाठी महत्वाच्या सुचना
(१) जर तुम्ही बाहेरगावी जाणार असेल तर आपल्या शेजारी राहणा-यांना सांगून ना.२) बाहेरगावी घर बंद करून जात असेल तर घरात रोख रक्कम व दागिने ठेवू नये.३) घराच्या दाराला कडी कोंडा ऐवजी सेन्ट्रींग लॉक चा वापर करावा.४) घराच्या दरवाज्याला १ होल आवश्यक आहे. जेणे करून अनोळखी इसम असल्यास माहिती मिळू शकेल.५) घराचे मुख्य दरवाजास सेफ्टी लोखंडी दरवाजा लावावा.(६) कोणताही अनोळखी इसम फेरीवाले, सोने उजळून देतो, भविष्य सांगतो असा लोकांना घरात प्रवेश देवू नये व शक्य झाल्यास अनोळखी इसमांचा मोबाईलमध्ये फोटो काढावा. (७) आपण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये, गल्लीत सामुहिक प्रयत्नातून सीसीटिव्ही लावण्याकरीता प्रयत्न करावा. (८) दुध आणुन देणारा, पेपर टाकणारा, भाजी विक्रेता, मुलांना शाळेत सोडणारे, रिक्षा, बसवाले, इलेक्ट्रिशियन,प्लंबर, घरात काम करणारी स्त्री / पुरुष यांचा मोबाईल क्रमांक, पुर्ण पत्ता, फोटो ठेवावे. घर फोडी करणारे आरोपी यांचे मार्फत लक्ष ठेवतात.९) आपण बाहेरगावी जात असाल तर घरातील लाईट घालु ठेवावी, जेणे करूण घरात कोणी तरी आहे असे दिसून येते. १०) फोनवरून किंवा मॅसेज वरुन तुमच्या बँक खात्याची माहिती विचारल्यास सांगु नये, OTP शेअर करू नये. (११) रात्रीचे वेळी घराबाहेरची लाईट चालु ठेवावी. जेणे करून पेट्रोलिंग करणा-या पोलीसांना लक्ष ठेवता येईल.१२) भाडेकरू ठेवायचे असल्यास त्यांची संपूर्ण माहिती ठेवावी व पोलीस स्टेशनला माहिती दयावी.१३) बाहेरगावी जातेवेळी Whatsapp/ Facebook व इतर सोशल मिडीयावर आपण कोठे आहे याबाबत माहिती टाकु नये.१४) आपल्या घराचे खिडक्या, दरवाजे यांना लोखंडी ग्रिल लावुन मजबूत करून घ्यावेत. १५) संशयीत व्यक्ती, सेल्समैन, फिरते क्रेते, विनाकारण भटकणारे, ये-जा करणारे संशयिताची माहिती तात्काळ पोलीसांनी दयावी व त्यास आवर्जुन हटकावे असे आवाहन ही पी आय संदेश केंजळे यांनी केले आहे.