ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याच्या निषेधार्थ मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन

396
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याच्या निषेधार्थ आज भाजप चे आमदार व ठाणे जिल्हा भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली  मुरबाड-नगर राष्ट्रीय महामार्ग 61 वर तीन हात नाका येथे रस्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले व सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणा आणि नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याच्या निषेधार्थ या बेजबाबदार सरकारचा धिक्कार करण्यासाठी तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू झाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणूका घेऊ नयेत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तसेच भाजपा ओबीसी मोर्चा मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तर्फे मुरबाड शहरातील तीनहात नाका येथे रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोको चे नेतृत्व आमदार किसन कथोरे यांनी केले. याप्रसंगी भाजपाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात  सहभागी झाले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *