इंधन दरवाढीचे ग्रामीण भागातील नागरिकांच्या माथी आस्मानी संकटासोबत महागाईचे सुलतानी संकट ; मुरबाड काँग्रेस आक्रमक

465

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : देशभरात इंधन दरवाढ व यामुळे झालेली महागाई यामुळे ठिकठिकाणी आंदोलन छेडले जात असताना सोमवार दि.12 जुलै रोजी मुरबाड तालुक्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पक्षाचे प्रभारी सुभाष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात जनआंदोलनचा दुसऱ्या टप्पाची सुरवात माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, शहापुरचे महेश धानके, परशुराम भोईर, रविंद्र परटोले, संजय शेलार, जयवंत पवार, तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना सरकार कर लावून जनतेवर आर्थिक भार टाकत आहे. 18 रुपये रस्ते विकास सेस, 4 रुपये कृषी सेस माध्यमातून नागरिकडून वसूल केला जात आहे. सरकारने डिझलवर 820 टक्के, तर पेट्रोल वर 258 टक्के एकसाईज ड्युटी लावली असून या माध्यमातून 7 वर्षात सरकारने 22 लाख कोटी नफेखोरी केली असल्याचे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या इंधन दरवाढ व घरगुती गॅस च्या वाढत्या दरामुळे  ग्रामीण आर्थिक परिस्थिती ढासळत असून आज या विरोधात तालुक्यातील एसार पंप (टोकावडे), भारत पंप (शिवळे), भारत CNG/पेट्रोल पंप ( मुरबाड) व हिंदुस्तान पंप ( मुरबाड) याठिकाणी स्वाक्षरी मोहीम व २५०० पत्रके वाटप करण्यात आले. ज्यामध्ये जवळपास ३००० नागरिकांनी स्वाक्षरी देवुन आपला उस्पुर्त असा सहभाग नोंदवला. यावेळी महिलाअध्यक्ष संध्या कदम, विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे,  सुनील साबळे, नेताजी लाटे, शुभांगी भराडे, बिपिन भावार्थे, जयवंत हरड, प्रकाश लिहे, अनंता तिवार, दिपक चिडा, संजय चौधरी, जयराम उघडा, स्वप्निल जाधव, नितीन चोरघे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे तालुक्यांतील नागरिकांना आस्मानी संकटा बरोबर केंद्र सरकार निर्मित सुलतानी संकटाला देखील सामोरे जायला लागत असल्याचे मत तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *