पाेलीसांची माेठी कारवाई ; १८ लाख ६६ हजारांचा बेकायदा विमल गुटखा दाैंड पाेलीसांनी केला जप्त

187

दौंड, पुणे  (प्रतिनिधी, सुभाष कदम ) : दाैंड पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक विनाेद घुगे तसेच दाैंड पाेलीस स्टेशन अंकित रावणगाव पाेलीस दूरक्षेत्र येथील पाे.हवा.मलगुंडे,पाे.ना.भागवत, हंडाळ व कुरकुंभ पाेलीस मदत केंद्राचे सहा.फाैजदार शिंदे पाे.ना.पवार, चालक सहा. फाैजदार साळुंखे, रात्रीच्या गस्तीवर असताना खडकी गावच्या हद्दीत हाॅटेल आकांक्षाच्या समाेर संशयित महेंद्रा बाेलेराे पिकअप वरील चालक नामदेव मधुकर लवटे वय २७ वर्षे रा.निजामपूर काेकरे मळा,ता.सांगाेला जिल्हा साेलापूर व गाडी मालक दत्तात्रय पाडुरंग खांडेकर वय ४४ वर्षे रा.खैराव सिध्दाेबा मंदिराजवळ ता.जत,जिल्हा सांगली हे गाडी मध्ये १८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा (पान मसाला) तंबाखू विना परवाना बेकायदेशीर वाहतूक करीत असताना मिळून आले. त्यांच्यावर दाैंड पाेलीसांनी भा.द.वि.कलम ३२८, १८८, २६९, २७२, २७३, ३४ सह अन्न  सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३०(२),२६(२) कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पाे.अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पाेलीस अधिक्षक मिलींद माेहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दाैंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम पाे.हवा. बंडगर करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *