कवठे येमाईतुन भीमाशंकर कारखान्यास सलग दोन वर्षे सर्वाधिक ऊस पुरवठा –  दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गावाचा गौरव 

285
         शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर,आंबेगाव सह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या दत्तात्रयनगर पारगाव ता.आंबेगाव येथील भिमाशंकर सहकारी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दि. २४ रोजी काराखाना स्थळावर संपन्न झाली. कार्यक्रमास राज्याचे माजी  गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास सलग दोन वर्षे सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावास मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गावाचा गौरव करण्यात आला.
           हा पुरस्कार स्विकारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर,बाळासाहेब डांगे,अविनाश पोकळे,पांडुरंग भोर,सचिन बोर्हाडे ,किसन हिलाळ,गणेश उघडे,राजेंद्र इचके,विठ्ठल घोडे,निखिल घोडे पाटील,बाळु रोहिले,पोपट रोहिले मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.या पुरस्काराने कवठे येमाई गावचे नाव शेती क्षेत्रात उंचावले आहे.
            कार्यक्रमास आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम, चेअरमन भगवान उर्फ बाळासाहेब बेंडे पाटील,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे,शिरूचे मा.आमदार पोपटराव गावडे, मानसिंग भैया पाचुंदकर पाटील,विवेक वळसे पाटील,प्रदीप वळसे पाटील,विष्णू काका हिंगे पाटील,राजुशेठ गावडे व कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,कर्मचारी उपस्थित होते..सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केले.ही सर्वसाधारण सभा कोरोना नंतर दोन वर्षानी पहिल्यांदाच झाली.
” भीमाशंकर कारखान्याचा संक्षिप्त लेखाजोखा सांगितला. मागील वर्षी कारखान्याने अकरा लाख शहांशी हजार चारशे सव्वीस मेट्रिक टन ऊस गाळप केले ,शेतकर्यांमध्ये आडसाली ऊस घेण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे ऊस लवकर जात नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये चलबिचल होते परंतु नोंद झालेला ऊस नेण्याची जबाबदारी कारखान्याची राहील,आपला ऊस बाहेरील कारखान्याला न देता आपल्या हक्काच्या भिमाशंकर कारखान्यालाच द्या जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त फायदा देता येईल” 
– बाळासाहेब बेंडे – चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *