वारजे मधून एकाचे अपहरण करुन गंभीर मारहाण केलेल्या सराईतांस वारजे माळवाडी पोलीसांनी केले जेरबंद

194

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) :  “तुझ्यामुळे माझी बहिण निघून गेली” असे म्हणत एकाचे रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी अपहरण करून मोबाईल हिसकावून घेत, मारहाण करणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. याबाबत गौरव राजू पवार (वय ३२ रा. सिप्ला फौंडेशन जवळ, वारजे माळवाडी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेतील आंबेगाव बुद्रुक येथे राहत असलेल्या संशयित आरोपीची बहिण गुरुवार दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी घरातून कोठेतरी निघून गेल्याने, गौरव पवार यांचेवर संशय घेवून गौरव यास त्याचे, वारजे माळवाडी मधील सिप्ला हॉस्पिटल परिसरातील सोसायटी मधील राहत्या घरातुन अपहरण करुन जाभूळवाडी व तेथून आबेगाव बुद्रक येथील कोणत्यातरी होस्टेलवर नेवून शुभम व त्याच्या तीन मित्रांनी कोयत्याने, पट्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. शिवाय गौरव पवार यांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला. याबाबत वारजे पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे, तपासपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे यांचेसह पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ, अमोल राऊत, अजय कामठे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने कात्रज मधील तिरंगा चौकात सापळा रचुन मोठ्या शिताफीने संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची विचारपुस केली असता, वारजे पोलिसांना अपेक्षित असलेले शुभम विलास पवार (वय २६, रा.लिपाणे वस्ती, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे), प्रथमेश महादेव येनपुरे (वय २३) आणि यशराज शिवप्रसाद मिसाळ (वय १८ दोघेही रा. काचेआळी, रविवार पेठ, पुणे) संशयित आरोपी असून, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तीनही इसमांना अटक करण्यात वारजे पोलिसांना यश आले. त्यातील एक इसम सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ पौर्णिमा गायकवाड, कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या आदेशान्वये तपासी अधिकारी यशवंत पडवळे तसेच तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, हणमंत मासाळ, अमोल राऊत, पोलीस शिपाई अजय कामठे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी यांनी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *