पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे आगळे-वेगळे आंदोलन

331

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : देशातील जनता कोरोना महामारिमुळे आधीच त्रस्त झाली आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले असतांना केंद्र सरकारचे काम त्यांना आधार देणे होते, परंतु आता या सरकारेने सामान्य माणसाचे जगणेही अवघड केले असून, मुठभर लोकांच हित जोपासन्यात व्यस्त असलेल्या या केंद्र सरकारच्या विरोधात व जीवघेण्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांच्या नेतृत्वात अकोला महानगरातील स्थानिक सिव्हिल लाईन चौक येथे हुबेहुब पेट्रोल पंपाची प्रतिकृति तयार करीत हे पेट्रोल-ड़ीझेल आता जन-समान्यांची हातची गोष्ट राहिलेली नाही, म्हणुन पेट्रोल पंप मशीन पुर्णपणे नेस्तनाभुत करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसून येत होता. अकोला महानगरातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग दर्शविला. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी पंकज देशमुख, दिनेश लोहोकार, विलास काळे, अंकुश भेंडेकर, कार्तिक पोदाडे, सुजय ढोरे, भुषण चतरकर, अभय ताले, तुषार गावंडे, सागर ढोरे यांनी विशेष प्रयत्न केले.तर या आंदोलनात बबनराव चौधरी, साजिद खान पठान, प्रकाश तायड़े, मदन भरगड, राजेश भारती, डॉ.सुभाष कोरपे, प्रशांत वानखड़े, सौ.पुष्पा देशमुख, महेश गणगणे, कपिल रावदेव, अंशुमन देशमुख, पराग कांबळे, आकाश कवडे, मो.इरफान, रवि शिंदें, मोंटी भाई, महेंद्र गवई, दिनेश लोहोकार, गणेश कळसकर, मो.यूसुफ, सुरेश ढाकुलकर, प्रशांत भटकर, राजेश मते, अंकुश तायड़े, राहुल सारवान, अंकुश भेंडेकर, कार्तिक पोदाडे, ढोरे,सतीश भागवत, राजेश सपकाळ, गजानन आसोलकर, रेवती तवर, मनीषा महल्ले, दिनेश खोब्रागडे, विशाल इंगळे, अजय चव्हाण, मनोज मिश्रा, प्रशांत प्रधान, रविन्द्र तायड़े आदिंसह शहरातील प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *