कान्हूर मेसाई आरोग्य उपकेंद्रास ग्रामपंचायतीकडून संगणक,प्रिंटर भेट

398

कान्हूर मेसाई आरोग्य उपकेंद्रास ग्रामपंचायतीकडून संगणक,प्रिंटर भेट
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई आरोग्य उपकेंद्रास येथील ग्रामपंचायतीकडून सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे संगणक,प्रिंटर साहित्य आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शहाजीराव दळवी यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.
या आधीही ग्रामपंचायतीच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास वेळोवेळी मदतीचा हात देण्यात आला असून आज ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून संगणक,प्रिंटर संच भेट देण्यात आला. तर कोरोना काळात ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना किट,गोळ्या,औषधे तसेच संपूर्ण गावठाण परिसर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून वेळोवेळी निर्जंतुकीकरण असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
आज येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक,प्रिंटर साहित्य भेट देण्याप्रसंगी सरपंच चंद्रभागा खर्डे,उपसरपंच संदीप तांबे, ग्रामपंचायत सदस्य सोपान पुंडे,विजय घोलप,शर्मिला तळोले,आसिया तांबोळी, आरोग्य सेविका प्रियांका लंघे,ग्रामविकास अधिकारी घासले,माजी सरपंच दादासो.खर्डे, माजी उपसरपंच दीपक तळोले,तलाठी जोशी,पोलीस पाटील कमलेश शिर्के,विठ्ठलराव खर्डे,युनूस तांबोळी,अल्ताफ तांबोळी,भरत गायकवाड,बाळू लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *