मातंग वस्तीसाठी रस्त्याचे काम करा – फक्कड पंचरास यांची जि.प. सदस्या सुनीता गावडे यांना निवेदनाद्वारे मागणी 

687
 मातंग वस्तीसाठी रस्त्याचे काम करा – फक्कड पंचरास यांची जि.प. सदस्या सुनीता गावडे यांना निवेदनाद्वारे मागणी 
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या मातंग वस्तीतील रहिवाशांना रहदारीसाठी फायदेशीर असणारा परंतु वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला आंबेडकर नगर,मातंग वस्ती ते फाकटे रोड हा सध्यस्थितीत अत्यंत दयनीय व दगड गोटयांचा असलेला रस्ता तातडीने डांबरी किंवा काँक्रीट करावा अशी मागणी मातंग समाजाचे कवठे येमाई येथील सामाजिक कार्यकर्ते फक्कडराव पंचरास यांनी केली आहे. या रस्त्याच्या प्रश्ना बाबतचे निवेदन त्यांनी आज दि. २८ ला जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांना दिले. तर लवकरच या रस्त्याच्या कामासंदर्भात पाठपुरावा करून हे काम सुरु करू असे आश्वासन गावडे यांनी दिले.
            भारत स्वातंत्र झाल्यापासून कवठे येमाईच्या आंबेडकर नगर ते फा कटे रोड हा जेमतेम अर्धा किलोमीटरचा रस्ता आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे,झाडेझुडपे,दगडगोटे दिसत असून मातंग वस्तीतील रहिवाशांना दळणवळणासाठी अत्यंत अडचणीचे ठरत आहे. याच रस्त्यावर फाकटे रोड नजीक असणाऱ्या दत्त ओढ्यावर मजबूत पूल ही होणे गरजेचे आहे. हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनविल्यास परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा मोठाच फायदा होणार असून टाकळी हाजी,येमाई माता मंदिर,मलठण कडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी ही मोठा फायदा होणार असल्याने हा रस्ता तात्काळ व्हावा अशी मागणी पंचरास व मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. हा रस्ता प्राधान्याने व्हावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने ही शिफारस करण्यात आल्याची माहिती सरपंच मंगलताई रामदास सांडभोर यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *