जरांगे पटील यांना पाठिंबा म्हणुन उपोषणास बसलेले चिंचणीचे भाऊसाहेब चौधरी यांचे उपोषण मागे – तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

768

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून शिरूर तहसील कार्यालय आवारात दि. १३ पासून आमरण उपोषणास बसलेले शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील शेतकरी भाऊसाहेब महादेव चौधरी यांनी प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर काल दि.१५ रोजी सायंकाळी सात वाजता शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते सरबत घेत व
शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले.
यावेळी चिंचणीचे माजी उपसरपंच अनिल माणिक पवार,भाऊसाहेब धावडे,माजी सरपंच गजानन जगताप,तहसील कार्यालयातील अव्वल कारकून पाटील,,युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक पत्रकार संरक्षण संघटना भारतचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,सुदाम चव्हाण,कल्पना पाचर्णे-पुंडे,सविता करंजुले,रामलिंग महिला उन्नती बहू उद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राणी (अश्विनी) कर्डिले,महेश पवार,अमोल चौधरी व उपोषणास पाठिंबा देणारे अनेक नागरिक उपस्थित होते.
तमाम सकल मराठा सामाजाच्यावतीने जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन चौधरी हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी तहसीलदार शिरूर यांना दिले होते.यात प्रामुख्याने प्रशासनाने शिरूर तालुक्यातील ज्यांची नोंद आहे त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र मिळावे,व मराठा बांधवाना लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र मिळणेकामी लागणारे दाखले, कागदपत्रे यांची त्वरित पूर्तता करावी. तसेच यात सख्खे,सगेसोयरे यांचा समावेश करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी भाऊसाहेब चौधरी हे आमरण उपोषणास बसले होते.
महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे मंत्रीमंडळातील इतर सर्व सहकारी यांनी
सराटी अंतरवाली या ठिकाणी मराठ्यांचा आरक्षण योदधा मनोज जरांगे पाटील यांना आश्वासीत केले होते,परंतु मराठ्यांना ओ.बी.सीमध्ये/कुणबी जातीमध्ये समाविष्ट करून घेवू असे आश्वासन दिले असताना महाराष्ट्र शासनाकडून तमाम मराठी बांधवांची फार मोठ्याप्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तमाम सकल मराठा सामाजाच्यावतीने  पाठिंबा म्हणुन चौधरी यांनी हे आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या मागण्यांना स्थानिक प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने चौधरी यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *