अपघातात जखमी झालेल्या बिबट्याला शोधण्याचे वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न – पण बिबट्या सापडला नाही

604

शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे ,मुख्य संपादक) – अष्टविनायक महामार्गावर शिरूर तालुक्यातील कवठे येमाई शिवारात काल दि.१५ ला रात्री साडेसातच्या सुमारास पोखरकर,कांदळकर वस्ती नजीक रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावर झेप घेतलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली.त्यात तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.घटना स्थळाजवळच रस्त्यावर दोन तरुण शेतकरी चर्चा करीत असताना त्यांना दुचाकीच्या उजेडात बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आला.दरम्यान जखमी अवस्थेतच हा मोठा बिबट्या नजीकच्या उसात गेल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.आज दुपारी ड्रोन द्वारे अपघातात जखमी
झालेल्या बिबट्याला शोधण्याचे वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.पण बिबट्या सापडला नाही.तशा ही अवस्थेत जखमी बिबट्या दूर सुरक्षित ठिकाणी गेला असण्याची शक्यता यावेळी उपस्थितांकडून सा.समाजशील शी बोलताना  व्यक्त करण्यात आली.
या घटनेची माहिती आज सकाळी शिरूर वन विभागास देण्यात आल्यानंतर वन कर्मचारी हनुमंत कारकूड तात्काळ घटनास्थळी हजर झाले. दरम्यान या विभागाचे वनपाल गणेश पवार,वनरक्षक नारायण राठोड,वनविभागाच्या मंचर रेस्क्यू टीमचे ह्रषिकेश ड्रोन सह दाखल झाले. ड्रोन द्वारे सुमारे एका किमी परिसराची पाहणी करण्यात आली. पण तो बिबट्या कॅमेरात दिसून आला नाही.असे असले तरी नागरिकांनी अत्यंत खबरदारी घेण्याचे आवाहन शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप,मंचर विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी राजहंस मॅडम यांनी केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *